नागपूर : शिवसेना १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी घेतलेल्या बैठकीचा विषय गाजत आहे. शिंदेना हटवण्यासाठी शिवसेनेच्या २२ आमदारांच्या सह्या होत्या. त्यात शिंदेंच्या काही आमदारांचाही समावेश आहे. असा दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवली तेव्हा हा खुलासा करण्यात आला आहे.
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?
शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची काल उलटतपासणी घेण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांना हटावण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी गेलेल्या शिंदे गटातील २३ आमदारांच्या सह्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र या सह्या बोगस असल्याचा दावा शिंद गटाकडून करण्यात आला आहे. यावर संजय शिरसाठ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, विधानसभेचं कामकाज सुरू असताना काही सह्या घेतल्या ह्या दुसऱ्या ठरावाला लावून बोगसगिरी करण्याचा काम करण्यात आला आहे. म्हणून आता जी सुनावणी सुरू आहे. त्यात त्यांचे प्रश्न आणि आमचे उत्तर यात तुम्हाला मोठी तफावत दिसून येईल. म्हणून खोट्याचं खोट आणि खऱ्याचं खरं या सुनावणी दरम्यान होणार असल्याचंही संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका
दरम्यान, ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी घेतली. यावेळी त्यांनी २१ जून २०२२ रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते ? या प्रश्नावर शिंदे गटाच्या साक्षीदाराला दाखवली. त्यावर २१ जून २०२२ च्या बैठकीची अटेंडन्स शीट ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आलेल्या अटेंडंटशिपनुसार सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी करून २१ च्या तारखेला बैठकीसाठी हजर राहण्याच्या सुचना दिल्या होत्.
यात २१ जुन २०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकूण २ आमदारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यात शिंदे गटात असलेले गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भूसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर, हे सर्व आमदार उपस्थित होते. याच बैठकीत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि गटनेता एकनाथ शिंदे यांना गटनेचे पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं. आता याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वकील उलट तपासणीमध्ये उपप्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?
हेही वाचा…“आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे”,प्रज्ञा साध्वींचा उल्लेख करत अजित पवार गटाचा फडणवीसांच्या भूमिकेला तीव्र विरोध