पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. परंतु आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्याने याठिकाणी पोटनिवडणुक झाली नाही. यानंतर पुणे लोकसभेचा पुढचा खासदार कोण होईल ? याची चर्चा होत असताना पुण्यात आता जोरदार बॅनरबाजी सुरू झाली आहे. मनसेचे फायर ब्रॅंड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या बॅनरने आता सर्वत्र चर्चा सुरूय.
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?
पुणे लोकसभेसाठी मनसेकडून वसंत मोरे इच्छूक आहेत. त्यांनी त्यांची इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे. यातच आता पुणे शहर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्व, अशा आशायचे बॅनर पुण्यात झळकू लागले आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात वसंत मोरे यांचा फोटो असलेले बॅनर झळकले आहेत. मनसे कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी बे बॅनर्स पुण्याच्या मध्यवर्ती भागात लावले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी देण्यात आलीय, त्यांचा दौरा होत असून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलीय.
हेही वाचा…“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलिधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, स्वरा बापट यांची नाव तर काॅंग्रेसकडून मोहन जोशी यांचं नाव चर्चेत आलं आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्वांची भावी खासदार म्हणून बॅनरबाजी केलेली याआधी दिसली आहे. त्यामुळे आता मनसेकडूनही अशीच बॅनरबाजी केली जात असल्याने पुण्यात भाजप, काॅंग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत बघायला मिळणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे”,प्रज्ञा साध्वींचा उल्लेख करत अजित पवार गटाचा फडणवीसांच्या भूमिकेला तीव्र विरोध
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?
हेही वाचा…अबब..! काॅंग्रेस खासदारांच्या घरावर IT ची रेड,२00 कोटी रूपये जप्त, पैसे मोजता मोजता मशिन पडल्या बंद, मोदींची टिका
हेही वाचा..नाशिकच्या शिरपेचात आणकी एक मानाचा तुरा, भारती पवारांना केंद्रात लागली आणखी लॉटरी, कायकर्त्यांमध्ये जल्लोष
हेही वाचा…NIA ची महाराष्ट्रात तब्बल ४३ ठिकाणी छापेमारी, बॉम्बस्फोटातील आरोपींसह १५ जण अटकेत