नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हांबाबत काल निवडणुक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद केला. यावेळी संघटनात्मक चाचणी होऊ नये यासाठी अजित पवार गटाकडून असा दावा करण्यात आली की, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात अंतर्गत निवडणुका या चुकीच्या पद्धतीने झाल्यात. परंतु असं काही नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
शिवसेना पक्ष फुटीनंतर उच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून वारंवार सांगण्यात आले की, संघटनात्मक चाचणी ही महत्वाची आहे. आमदार आणि खासदारांच्या संख्या जेवढ्या महत्वाच्या त्याहीपेक्षा संघटनात्मक चाचणी ही अत्यंत महत्वाची आहे, कारण आमदार आणि खासदारांच्या विरोधात जर अपात्रतेची सुनावणी अपूर्ण असेल तर त्यांच्या संख्या ग्राह्य धरणे ही चुकीचे आहे.
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
संघटनात्मक चाचणी होऊ नये यासाठी अजित पवार गटाकड़ून असा दावा करण्यात आला की, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षास अंतर्गत निवडणुका या चुकीच्या पद्धतीने झाल्यात. निवडणुका जर चुकीच्या पद्धतीने झाल्या असतील तर अजित पवार गट सिव्हिल कोर्टात का गेले नाही ? आत्तापर्यंत कोणत्याही सिव्हिल कोर्टात यासंदर्भात एकही केस अजित पवार गटाकडून फाईल केली गेलेली नाही. असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला.
दरम्यान, निवडणुक आयोगासमोर चिन्ह व पक्ष कोणाचा यासंदर्भात सुनावणी संपली असून आता या निकालाची प्रतिक्षा आहे. अजित पवार गटाकडून संघटनात्मक चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न सुनावणी दरम्यान झाला, याचा अर्थ हाच होतो की, महाराष्ट्र असो किंवा संपुर्ण भारत अजित पवार गटाकडे संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी यांची संख्या ही कमीच आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक
हेही वाचा…तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा निलंबित, ममता बॅनर्जी मोदी सरकारवर कडाडल्या, म्हणाल्या की,..
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील”, नवाब मलिकांना शरद पवार गटाची खंभीर साथ
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात