नागपूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात महायुतीने घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. यानंतर आज प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली आहे. यातच आता नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवारांसह छगन भुजबळ अजित पवार गटाची बैठक सुरू आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर
नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात जवळपास १५ मिनिटं बैठक झाली आहे. अजित पवारांच्या कॅबिनमध्येही बैठक झाली आहे. या बैठकीत नवाब मलिक यांना घेऊन सुरू झालेल्या वादंगावर चर्चा झालीय. नवाब मलिक यांना वेट एॅंट वॉचचा सल्ला अजित पवारांनी दिल्याची सुत्रांनी दिली आहे. सुनावणी सुरू असेपर्यंत आणि आरोप सिद्ध होत नाहीत. तोपर्यंत नवाब मलिक यांच्या बाबतीच मित्रपक्षांनी आपली भूमिका मवाळ करावी असा नेत्यांचा सुर आहे. याबाबत अजित पवार हे फडणवीसांशी सविस्तर बोलणार आहेत.
हेही वाचा..नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहात हजर झाले. सुरूवातीला त्यांनी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांची भेट घेऊन कार्यालयात दाखल झालेत. त्यानंतर मलिकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याच्या बातम्या समोर आल्या. यातच ज्यावेळी मलिक सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाजूच्या बाकावर बसले त्यानंतर अंबादास दानवेंनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. यातच आता नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका. अशी थेट मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे अजित पवारांकडे केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?
हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता
हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र