नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला नवाब मलिकांचा मुद्दा जोरदार गाजला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने विरोधकांनी जोरदार आवाज उठवला. त्यानंतर मलिकांना महायुतीत घेता येणार नसल्याचं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उचलून धरला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार
प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही भूमिका स्पष्ट करण्याची विनंती अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीन भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हे यातून दिसले. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ईडीने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीन भावना आहेत. तशाच भावना, प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे. असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार, कार्यक्रम जाहीर
दरम्यान, अजित पवारांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलंय की, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे.
नवाब मलिक ह्यांच्याबाबत जशा तीव्र भावना आहेत तशाच दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल ह्यांच्याबाबतही आहेत का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे केली.@iambadasdanve pic.twitter.com/XCcY5O4DLy
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर
हेही वाचानवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……
हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर
हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…विरोधकांच्या मिरच्या भाजपला झोंबल्या, नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, थेट फडणवीसांचं अजितदादांना पत्र