नागपुर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांवरून काल विधानसभेत मोठा राडा झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिकांवरील भूमिका मांडण्याची सरकारला विनंती केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आक्रमक भूमिका घेतली. यातच विरोधकांच्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, असं म्हणत अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“देवेंद्र भाऊ सरडा सुद्धा बघून आत्महत्या करेल हो..!” संजय राठोड, नवाब मलिक प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.
हेही वाचा…“विरोधकांच्या घोषणानंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले”, नेमकं काय घडलं ?
खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये असं म्हटलंय की, सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार,ED फेम भावना गवळी,सरनाईक, मुलुंड चे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे. हल्ला फक्त मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर. असा हल्लाबोल राऊतांनी भाजपवर केला आहे. तसेच
पिते दूध डोळे मिटूनी. जात मांजराची. असा खोचक टोला ही त्यांनी भाजपला लगावला आहे.
अरे बापरे!
सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली.महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते..त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल,सिंचन घोटाळा फेम अजित पवार,ED फेम भावना गवळी,सरनाईक, मुलुंड चे नागडे पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे..यांचा देश… https://t.co/nu03sidgmc— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…“विरोधकांच्या मिरच्या भाजपला झोंबल्या, नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, थेट फडणवीसांचं अजितदादांना पत्र
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार, कार्यक्रम जाहीर
हेही वाचा…“नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं, अन्.., ट्विटरवर चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे एकमेकांत भिडल्या