नागपूर : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीचार्ज हल्लाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं लेखी उत्तर सादर केलं आहे. लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटलांकडून करण्यात आली होती. तर या लाठीचार्ज हल्ल्यात काही पोलिस ही जखमी झाले होते. त्यानंतर अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं लेखी उत्तर सादर केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार, कार्यक्रम जाहीर
अंतरवाली सराटीत केलेल्या दगडफेकीत किंवा आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागले असता यामध्ये ७९ पोलि अधिकारी आणि अंमलदार यावेळी पोलिसांचा बचावात्मक पद्धतीने बळाचा वापर करण्यात आला. यावेळी ५० आंदोलक जखमी झालेत. त्यातच नांदेडमध्ये आंदोलनात १४ पोलीस जखमी तर बीडच्या घटनेत ६ पोलीस जखमी झाले आहेत. आंदोलकांवरचे गुन्हे तपासणी करूनच मागे घेतले जाणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यातच लाठीचार्ज प्रकरणी ३ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचं गृहविभागाने सांगितलं आहे. यामध्ये जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक निलंबित करत तसेच अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी देखील निलंबित करण्यात आला आहे. त्याचबरोबर गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांवरही निलंबणाची कारवाई करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं, अन्.., ट्विटरवर चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे एकमेकांत भिडल्या
दरम्यान, अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीचार्ज हल्लाबाबत अनेक घडामोडी घडतांना दिसत आहेत. या हल्लामागील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, तसेच लाठीचार्जचा आदेश देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली होती. त्यामुळे आता यावरून सभागृहात काय गोंधळ माजणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचानवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……
हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर
हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…विरोधकांच्या मिरच्या भाजपला झोंबल्या, नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, थेट फडणवीसांचं अजितदादांना पत्र
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार