मुंबई : काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधीलमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमानकारक विधान केले. त्यांच्या या विधानाचा भाजपकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तर संपुर्ण राज्यात प्रियांक खरगे आणि काॅंग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावरून आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
हेही वाचा…विरोधकांच्या मिरच्या भाजपला झोंबल्या, नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, थेट फडणवीसांचं अजितदादांना पत्र
सचिन सावंत यांनी बावनकुळेंना काही प्रश्न केले आहेत. त्यात महात्मा गांधींच्या खुन्याचा भाजपचे नेते खुलेआम उदोउदो करतात. गिरीराज सिंह, प्रज्ञा ठाकूर अशी यादीच देता येईल. पण मोदी केवळ म्हणतात त्यांना माफ करणार नाही. गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्या जातात. खुलेआम धर्मसंसदेत अर्वाच्च भाषा वापरली जाते. गांधी जयंती दिवशी भाजपा कार्यकर्त्यांकडून खुलेआम हॅशटॅग केले जातात. मग तेव्हा भाजपा आंदोलन का करत नाही? असा सवाल सचिन सावंतांनी केलाय.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार
दरम्यान, पुढे बोलतांना सावंत म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, तसेच शिवाजी महाराजांबद्दल कोश्यारी अनुद्गार काढतात तेव्हा आंदोलन का केले नाही? सावरकरांच्या विचाराला नकारात्मक प्रतिक्रियात्मक हिंदूत्व व त्यांच्या भूमिकेची तुलना मुस्लिम लीगशी करून मुस्लीम लीगची राष्ट्रविरोधी हिंदू प्रतिमूर्ती म्हणण्या इतपत गोळवलकर पोहोचले होते. यावर भाजपाचे म्हणणे काय ते सांगावे. गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का? हे आधी सांगा. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी इंग्रजांना पत्र लिहून चले जाव आंदोलन मोडून काढण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले ते तुमचे राष्ट्रपुरुष. आणि इंग्रजांना मदत करणारा संघ राष्ट्रभक्त! आता संघाविरुद्ध आंदोलन कधी करणार तेही सांगा. असंही त्यांनी म्हटलंय.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांना प्रश्न –
१. महात्मा गांधींच्या खुन्याचा भाजपाचे नेते खुलेआम उदोउदो करतात. गिरीराज सिंह, प्रज्ञा ठाकूर अशी यादीच देता येईल. पण मोदी केवळ म्हणतात त्यांना माफ करणार नाही. गांधींच्या पुतळ्याला गोळ्या झाडल्या जातात. खुलेआम धर्मसंसदेत… https://t.co/qCl66XiZgj— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…मोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर
हेही वाचानवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……
हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर
हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…