नागपूर : शिवसेना १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सध्या नागपुरात विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी सुरू आहे. येत्या २२ नोव्हेंबरपर्यंत ही सुनावणी पार पडणार असून येत्या ३० तारखेपर्यंत यावर निकाल देणे विधानसभा अध्यक्षांना क्रमप्राप्त आहे. यातच सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवून घेतली. या मध्ये एका बैठकीत एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी झालेल्या बैठकीत शिंदे गटातीलच आमदार असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागणार आहे.
हेही वाचा…नवाब मलिकांना महायुतीत घेण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विरोध, आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी घेतली. यावेळी त्यांनी २१ जून २०२२ रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षादेशानुसार किती आमदार उपस्थित होते ? या प्रश्नावर शिंदे गटाच्या साक्षीदाराला दाखवली. त्यावर २१ जून २०२२ च्या बैठकीची अटेंडन्स शीट ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आलेल्या अटेंडंटशिपनुसार सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी करून २१ च्या तारखेला बैठकीसाठी हजर राहण्याच्या सुचना दिल्या होत्.
हेही वाचा…विरोधकांच्या मिरच्या भाजपला झोंबल्या, नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, थेट फडणवीसांचं अजितदादांना पत्र
यात २१ जुन २०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकूण २ आमदारांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यात शिंदे गटात असलेले गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भूसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर, हे सर्व आमदार उपस्थित होते. याच बैठकीत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि गटनेता एकनाथ शिंदे यांना गटनेचे पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. ज्याला या आमदारांनी अनुमोदन दिलं. आता याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वकील उलट तपासणीमध्ये उपप्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते वडेट्टीवारांच्या घरी पोहचले, सरकारच्या विरोधात मोठी रणनिती तयार
दरम्यान, या सर्व प्रकरणावर विचारले असता दिलीप लांडे यांनी आपल्या साक्षीमध्ये यावर केलेली सही आपलीच असल्याचं कबूल केलंय. पण त्यामध्ये वरती लिहिण्यात आलेल्या पक्षादेश क्रमांक हा आमच्या सह्या घेतल्यानंतर घेण्यात आला असं त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…मोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर
हेही वाचानवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा विरोध, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी नेहमी सत्याच्या बाजूने……
हेही वाचा…“हल्ला फक्त मलिकांवर का ? भावना गवळी, पटेल अजित पवार, सरनाईक हे यांच्या मांडीवर