इंदापूर : राज्यात सध्या ओबीसी विरूद्ध मराठा असा आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यामागणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या संपुर्ण महाराष्ट्रात सभा होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, यामागणीसाठी मंत्री छगन भुजबळ लढत आहेत. त्यातच आता मंत्री छगन भुजबळांची इंदापुर येथे सभा होत आहे.
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळांची राज्यात ही तिसरी सभा होत असून या सभेसाठी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या सभांमधून मंत्री छगन भुजबळांनी जरांगे पाटलांच्या विरोधात उघड उघड भूमिका मांडली आहे. त्यावर जरांगे पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. त्यातच आता इंदापुर येथे उद्या ९ डिसेंबर रोजी सभा होत असल्याने या सभेत भुजबळ काय बोलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज कुणावर कारवाई केली? फडणवीसांचं लेखी उत्तर
दरम्यान, भुजबळांची इंदापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या अनुषंघाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामणी हद्दीत शहरातील संविधान चौक ते स्मशानभूमी चौक १०० फुटी रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आलीय. ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजपेर्यंत ही वाहतूक तात्पुरती बंद करून बाबा चौक ते खुळे चौक ते राजेवलीनगर या मार्गे वाहतूक वळविण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?
हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता
हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल