पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांवरून सध्या महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. त्यांनी हा विरोध अजित पवारांना पत्र पाठवून दाखविला आहे. त्यावरून आता महायुतीत मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल
नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहे हे सिद्ध होईलच. इतरांवर वाईट वेळ असताना त्यांचा धाडसाने बचाव करणारे नवाबभाई आज अडचणीत असताना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी सत्ता जाण्याच्या भीतीने त्यांना दूर ढकलणे दुर्दैवी असल्याचा टोला प्रशांत जगताप यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांचे संबंध दाऊदच्या हस्तकांशी., पटेल अमित शाहांना भेटले, खुलासा करावा, दानवेंचं फडणवीसांना पत्र
तसेच देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. थोडक्यात सध्या केवळ साध्या साबणाने धुलाई झालीय, भाजपा वॉशिंग मशीनमध्ये धुलाई अजून बाकी आहे. नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप आहेत. म्हणून त्यांना फडणवीसांनी प्रवेश नाकारला. मग ज्यांच्या घरांवर ईडीने धाडी टाकल्या ते हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, भुजबळ निर्दोष आहेत, त्यांच्यावर केवळ सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे फडणवीसांना मान्य करावं लागेल. फडणवीस एक्सपोज झाले आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील. राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहे हे सिद्ध होईलच.
इतरांवर वाईट वेळ असताना त्यांचा धाडसाने बचाव करणारे नवाबभाई आज अडचणीत असताना त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी सत्ता जाण्याच्या भीतीनं त्यांना दूर ढकलणे दुर्दैवी आहे.— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?
हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता