नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यसत् रद्द करण्यात आलं आहे. पैसे घेऊन लोकसभेत पैसे विचारल्या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष आणि संसेदच्या एथिक्स समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यावरून आता देशात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?
मी खूप दु:खी आहे. अर्ध्या तासात ४०० पेक्षा जास्त पाने कशी वाचली हे समजत नाही. इंडिया आघाडीचे आभार मानते. कारण सर्वजण एकत्र आले. महुआला बोलण्याची संधी देण्यात आलेली नाही. हा पुर्ण अन्याय असून लोकशाहीची हत्या आहे. असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता
मी अदानी मुद्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यसत्व रद्द करण्यात आलंय. एथिक्स समितीसमोर माझ्यासमोर कोणताही मुद्दा नव्हता. कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला. मी सध्या ३९ वर्षाची आहे. पुढील ३० वर्ष संसदेच्या आत आणि बाहेर देखील या प्रश्नावर लढत राहिन, अशी प्रतिक्रिया महुआ मोईत्रा यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केले होते. मोईत्रा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे देशद्रोहींने अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यातील लाच व्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील”, नवाब मलिकांना शरद पवार गटाची खंभीर साथ
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द