पुणे : पुणे जिल्ह्यातील तळवडे भागात गोदामाला आग लागली आहे. यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आगा एवढी भीषण होती की त्यामध्ये सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तळवडे एमआयडीसीमध्ये वाढदिवासाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती, फटाकांच्या कंपनीत आग लागली आहे. आत्तापर्यंत ७ मृतदेह मिळाले आहेत. या घटनेवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर २३ जणांच्या सह्या ; सामंत, गुलाबराव पाटील, केसरकरांचा समावेश, ठाकरेंनी काढला मोठा पत्ता
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागून यामध्ये मोठी जीवितहानी झाली. या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मयत व्यक्तींच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. हे गोदाम अनधिकृत असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“गोळवलकरांचा निषेध करुन त्यांचे विचारधन जमीनीत गाडणार का?” काॅंग्रेसचा भाजपला तिखीट सवाल
दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे ‘फायर कँडल’ तयार करणार्या एका कारखान्याला आग लागून 6 महिलांचे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जखमी असून, त्यातील 5 गंभीर आहेत. जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचाराची काळजी घेतली जात आहे. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती सर्व मदत दिली आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागून यामध्ये मोठी जीवितहानी झाली. या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मयत व्यक्तींच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
हे… https://t.co/2CsRgQnkUr— Supriya Sule (@supriya_sule) December 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील”, नवाब मलिकांना शरद पवार गटाची खंभीर साथ
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?