नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज ऑनलाईच्या नावाखाली तरूणांना लुटणाऱ्या गेमिंग अॅपबाबत जोरदार चर्चा झाली. तर दुसऱ्या बाजूला नागपुरात काॅंग्रेस युवकांने युवकांच्या प्रश्नाबाबत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी पोलिस आणि काॅंग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापटी झाल्या. तर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काॅंग्रेसच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा…तृणमूल काॅंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ प्रकरणावरून महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द
आज नागपूर येथे तानाशाही सरकार विरोधात विधानसभा घेराव आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे घेण्यात आले. विविध मागण्यांसाठी धाव घेतलेल्या युवकांना असा आपल्या सत्तेचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज करण्यात आला पण हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता . ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार आहे. राज्यातील बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, उद्योगधंदे परराज्यात निघून जात आहेत आणि तरुणांचे हाल होत आहेत. सरकारी पदांपेक्षा कंत्राटी नोकऱ्यांवर भाजपचा भर आहे.. या विधानसभा घेराव आंदोलनमध्ये आम्ही सहभागी झालो. असं ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.
हेही वाचा..माढा लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत कलह, रणजितसिंह निंबाळकरांसमोर मोहिते पाटलांचं आव्हान ?
दरम्यान, नागपुरात काढण्यात आलेल्या मोर्चात काॅंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले होते. यामध्ये बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, सुनील केदार, अखिल भारतीय युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही व महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांचा समावेश होता. तर असंख्य काॅंग्रेसचे कार्यकर्त्यांनी आंदोलना स्थळी निदर्शने केलीत.
READ ALSO :
हेही वाचा…तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा निलंबित, ममता बॅनर्जी मोदी सरकारवर कडाडल्या, म्हणाल्या की,..
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील”, नवाब मलिकांना शरद पवार गटाची खंभीर साथ
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय