नाशिक : भाजपच्या आमदार आणि केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा केंद्रात लॉटरी लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत भारती पवारांच्या रूपात नाशिकला प्रथमच केंद्रात मंत्रीपद मिळालं आहे. त्यात आता केंद्रात त्यांना आदिवासी विका विभागाच्या राज्यमंत्रीपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा…“नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील”, नवाब मलिकांना शरद पवार गटाची खंभीर साथ
अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही केंद्रीय मंत्र्यांनी तसेच खासदारांनी विधानसभेची निवडणुक लढविली होती. या विधानसभेत त्यांना मोठा विजय मिळवला आहे. यातच दोन सभागृहाचं सदस्यत्व स्विकारता येत नसल्याने त्यांनी खासदाराकीचा राजीनामा दिला. यातच छत्तीसगडच्या रेणुका सिंग यांच्याकडे आदिवासी विभागाचा राज्यमंत्री पदाचा कारभार होता. त्यांनी छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी आता केंद्रीय राज्यमंत्री पदाचा तसेच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता डॉ. भारती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपचे डझनभर अधिक खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरविले होते. यातून १२ हून अधिक मंत्री विजयी झाले आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी आता भाजपच्या इतर खासदारांची नियुक्ती केली जात आहे. भारती पवार ह्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या तिकीटावर पराजीत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून दमदार विजय मिळवला. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना केंद्रात केंद्रीय आरोग्य व कुटूंबकल्याण राज्यमंत्री पद देण्यात आलं. त्यानंतर आता त्यांच्याकडे आदिवासी विभागाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…NIA ची महाराष्ट्रात तब्बल ४३ ठिकाणी छापेमारी, बॉम्बस्फोटातील आरोपींसह १५ जण अटकेत
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?
हेही वाचा…“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक
हेही वाचा…तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा निलंबित, ममता बॅनर्जी मोदी सरकारवर कडाडल्या, म्हणाल्या की,..
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..