पुणे : दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) यांनी आज सकाळी धडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी एनआयएने छापेमारी केली असून अनेकांना ताब्यात देखील करण्यात आले आहे. तर पुण्यात एका ठिकाणी छापेमारी केली असून तेथीन काही वस्तू देखील जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा…भुजबळांची इंदापुरात जाहीर सभा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून महाराष्ट्रासह कर्नाटकात ४४ ठिकाणी छापे टाकले आहेत. एकट्या महाराष्ट्रात ४३ ठिकाणी एनआयएची छापेमारी केली असून एकूण १५ जणांना ताब्यात घेतले आहे. पालघर जिल्ह्यातील भिवंडीतील पडघा गावात एनआयए ने संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर यासाठी तब्बल ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात एनआयची याठिकाणी कारवाई सुरू आहे.
हेही वाचा…मलिकांबाबत अजित पवार गटाची बैठक, नवाब मलिकांविषयी अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय
एनआयएने पुण्यातील कोंढवा, मोमीनपुरा परिसरात छापेमारी केली आहे. कोंढव्यातील शोएब अली शेखच्या घरावर तर मोमीनपुरातील अन्वर अली याच्या घरावरही छापेमारी केली आहे. या छापेमारीतून लॅपटॉपसह मोबाईल आणि एक हत्यार जप्त करण्यात आले आहे. पुण्यात अद्याप एनआयने कुणालाही ताब्यात घेतलेले नाही. तर घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचन ला ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, एनआयएने साकिब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सूसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखलिस नाचन सैफ, आतिक नाचन याह्या खोत, राफिल नाचन, राझील नाचन, शकूब दिवकर, कासीफ बेलारे, मुंझिर केपी यांना ताब्यात घेतले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादी पक्षनाव अन् चिन्हाबाबत सुनावणी संपली, आता निकालाची प्रतिक्षा, कुणाच्या बाजूने लागणार ?
हेही वाचा…“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक
हेही वाचा…तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा निलंबित, ममता बॅनर्जी मोदी सरकारवर कडाडल्या, म्हणाल्या की,..
हेही वाचा..पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“नवाबभाई आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच असतील”, नवाब मलिकांना शरद पवार गटाची खंभीर साथ