इंदापूर : मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सभा संपुर्ण महाराष्ट्रात होत असून ते मंत्री छगन भुजबळांवर टिका करतांना दिसत आहेत. यातच आज मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात ओबीसींची एल्गार सभा झाली. या सभेत ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली. सरपंच देखील होऊन दाखव, असं आवाहन मंत्री छगन भुजबळांनी दिला.
हेही वाचा…“आपला तो बाब्या लोकांचे ते कार्टे”,प्रज्ञा साध्वींचा उल्लेख करत अजित पवार गटाचा फडणवीसांच्या भूमिकेला तीव्र विरोध
येवल्याचा येडपट असं मला म्हणतो. मी २ वेळा मुंबईचा महापौर झालो आहे. त्यानंतर महापौरांचा अध्यक्ष झालो. तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं. असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगे पाटलांना आवाहन दिलं. त्यानंतर गाढव टाकीवर चढले ठिक आहे, पण त्याला एवढ्यावर कुणी घेऊन गेलं? आता डोक्याला हात लावून बसलात पण त्याला जाऊ का दिलं? एवढ्या उंचावर गेलेल्या गाढवाला खाली कसं उतरवायचं ? असा खोचक सवाल भुजबळांनी केला.
हेही वाचा…“मलिकांबद्दल अजितदादांनी भूमिका स्पष्ट करावी, उगीचच एक मिनिट, एक मिनिट करून पत्रकारांना धमकावू नये”, कुणी डिवचलं?
दरम्यान, जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते तेथे पोलिसांनी सांगितले की चला. चला म्हणताच पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. विधानसभेत उपमुख्यमंत्री यांनी लेखी उत्तर दिले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. एकूण ८० पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही बाजू त्यावेळी पुढे आली असती तर त्याला सहानुभूती मिळाली नसती. अशी टिकाही भुजबळांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?