अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच लोकसभेला अमरावतीत महायुतीचा उमेदवार कोण ? असा सवाल मागील काही दिवसापासून सुरू झाला आहे. यातच विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा महायुती पाठिंबा देणार का ? की दुसरा उमेदवार याठिकाणी उभा करण्यात येईल, याची चर्चा होत असताना आता एक नवीन नाव समोर येत आहे.
हेही वाचा…कोल्हापुरात सतेज पाटलांची ”फिल्डिंग” भाजपला जड जाणार; पाटलांनी जिल्ह्यात उभारलं कार्यकर्त्यांचं नवीन जाळं
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना राष्ट्रवादीने अधिकृतपणे पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. परंतु त्यानंतर नवनीत राणा यांनी केंद्रात भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता महायुतीकडून नवनीत राणा यांना पाठिंबा दिला जाणार का ? अशी चर्चा सुरू होत असताना महायुतीकडून शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा..“सरकारला पश्चाताप करावा लागेल, फडणवीसांना उघडं पाडू,” जरांगे पाटलांनी दिला इशारा
दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत शरद पवारांनी नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या पाठबळावर नवनीत राणा विजयी झाल्यात. आता त्यांच्या विरोधातील आनंदराव अडसूळ देखील महायुतीत असल्याने महायुती आता कुणाच्या नावावर शिक्कामोर्तेब करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच नवनीत राणा यांनी अलिकडेच अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…“पुणे शहर लोकसभेसाठी मनसे सक्षम नेतृत्व,” पुण्यात वसंत मोरेंची बॅनरबाजी, तिरंगी लढत होणार ?
दुसऱ्या बाजूला अपक्ष आमदार बच्चू कडू देखील अमरावतीची जागा लढविण्यासाठी इच्छूक आहे. तर महाविकास आघाडीमध्ये अमरावतीची जागा शरद पवार गट लढविणार असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेस देखील या जागेवर आपला दावा सांगतांना दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…शिंदे सरकारचा अनगोंदी कारभार, देशाचा तिरंगा कार्यक्रमात लावला उलटा ; विरोधकांची सडकून टिका