कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते वारंवार पार्ट्या करत असतात. रात्री बेरात्री उशिरापर्यंत आराडाओरड सुरू असते. त्याचा त्रास होत असल्याचे क्षीरसागर यांना वारवारं सांगितले मात्र प्लॅट विकून दुसरीकडे जा असं सांगत क्षीरसागर यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप एका कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं
राजेश क्षीरसागर यांचा शेजाऱ्यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या प्रंचड व्हायरल होत आहे. त्यांच्याकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप राजेंद्र वरपे यांनी केला आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मात्र गुन्हा नोंद होत नसल्याने संबंधित कुटुंबातील तरूणीने आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शनिवारपेठ परिसरात क्षीरसागर ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्या शिवगंगा संकूल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबाकडून राजेंद्र वरपे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच मराहाणीचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील देण्यात आला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी शिंदेंच्याच २२ आमदारांच्या सह्या, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
दरम्यान, क्षीरसागर यांनी शुक्रवारी रात्री मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर वरपे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत वरपे म्हणाले की, शुक्रवारी रात्री पुन्हा पार्टी सुरू होती. त्यावेळी होणाऱ्या त्रासाबद्दल क्षीरसागर यांना सांगण्यात वरपे गेले होते. त्यावेळी स्वत: क्षीरसागर, त्यांचा मुलगा व घरातील कामगारांसह इतर काही लोकांनी वरपे यांच्यासह त्यांचा मुलगा, मुलगी यांना मारहाण, शिवीगाळ केली. तसेच तुझे हातपाय तोडतो. तुला गोळ्या घालतो, तुला काय करायचे कर अशी धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर