पिंपरी : राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षाची मिळून महायुती झाली असली तरी पुढील निवडणुका एकत्र लढतील असे सांगता येत नाही. कारण राजकारणात काहीही होतंय. याचा प्रत्यय मागील काही राजकीय घटनांवरून दिसून आला आहे. त्यामुळेच की काय पिंपरीत अजित पवारांचा आमदार असतांनाही भाजप याठिकाणी आपल्या उमेदवाराला सेट करण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
पिंपरीत सध्या अजित पवार गटाचा आमदार असून या मतदारसंघाच्या निर्मितीपासून भाजपला निवडणुक जिंकता आली नाही. त्याचे शल्य भाजपला सुरूवातीपासून आहे. अशातच आता पिंपरीत कमळ फुलवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांची सध्या पिंपरीच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संपर्क ते समर्थन अभियानाअंतर्गत पाच हजार घरी संवाद प्रवास करून सरल उपयोजनवर नोंदणीची जबाबदारी खापरे यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
सुरूवातीपासून पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु नंतरच्या काळात भाजपने भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावर वचर्स्व मिळवलं. भोसरीची जागा आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी तर चिंचवडची जागा जगताप कुटुंबीयांनी ताब्यात घेतली आहे. त्यानंतर आता भाजपचा पुढचा डोळा पिंपरी विधानसभा असून यासाठी मोठी रणनिती आखली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा.प्रदेशाध्यक्षांनी शुभेच्छा दिल्यात, पण अजितदादांच्या अद्यापही शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नाहीत, एकच चर्चा
हेही वाचा…लातुरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी जिल्ह्याप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…दिशा सालियन प्रकरणी SIT स्थापन होणार ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या?
हेही वाचा…मोठी बातमी..! जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, कुठे आहे सभा ?
हेही वाचा…सरकारमधील ‘दोन’ मंत्री कोण ? ज्यांच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा