नागपूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटीशनवर सुनावणी प्रलंबित असतानाचा राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांच सत्र सुरूच आहे. अलिकडेच राज्य मागासवर्गीय आयोगातील सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांचा मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचा आणि राज्य सरकारला हवा तसाच डेटा आयोगाने तयार करून द्यावा असा आयोगावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. कामकाजात सरकारमधील मंत्र्यांच्या लुडबुडमुळी दिला आहे. ते दोन मंत्री कोण आहेत ? यासंदर्भात अद्याप कोणती माहिती समोर आली नाही.
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे
दरम्यान, राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री.आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचं नेमकं अस चाललं काय ? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहे याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे. अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
याआधी महिनाभरातच आयोगातील पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बालाजी सागर किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके या दोन सदस्यांनी याआधीच राजीनामा दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही दबावामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे मराठा आरक्षणासाठी हवी ती माहिती मिळवण्याचे आणि आयोगाची पुनर्रचना करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे.
राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री.आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे.
राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची… pic.twitter.com/xnFywGHSZD
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश