नाशिक : केंद्र सरकारने कांद्यांवर निर्यात बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज याविरोधाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी चांदवड येथे रास्तारोको आंदोलन केले. याआधी नाशकात विविध नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यामध्ये माजी आमदार नितीन भोसले यांच्या घरी शरद पवार यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यातच लोकसभेच्या दृष्टीने आज ठाकरे गटाच्या नेत्यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्यास शरद पवारांची सहमती असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरेंच्या उमेदवारासाठी पवार नाशिकमध्ये प्रचार दौरे करणार का ? तसेच ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला का ? याबाबत माहिती नाही परंतु. शरद पवार नाशिक दौऱ्यावर आले असता ठाकरे गटाच्या नेत्यांनीही शरद पवारांच्या भेटली पोहोचले आहेत. माजी आमदार वसंत गीते, उबाठा गट जिल्हाप्रमुख विजय करंजकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत. ही सदिच्छा भेट आहे. शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक
नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या हेमंत गोडसे खासदार असून त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. तर नाशकात भाजपचे दोन आमदार असून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून विशेष करून महायुतीकडून हेमंत गोडसेंच्या नावाला पसंती दिली जाईल. अशी चर्चा रंगू लागली आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला मिळावी. अशी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान, शरद पवार नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माजी आमदार नितीन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. नितीन भोसले यांनी अलिकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. नितीन भोसले यांनी या आधी मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यात ते आमदार झालेत. यातच राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर नितीन भोसले यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन