बीड : गोपीनाथ मुंडे म्हटलं तर समोर येतो तो करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं जबरदस्त व्यक्तिमत्व. गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज महाराष्ट्रात भारतीय जनतेचा जो वटवृक्ष वाढलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे गोपीनाथ मुंडेंना जातंय. त्यांची आज जयंती असून मंत्री धनंजय मुंडे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी देखील याबाबत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे
स्व.मुंडे साहेब हे नाव घेतलं की समोर येतो साहेबांचा चेहरा, तो चेहरा ज्याने आयुष्यभर शेतकरी-कष्टकऱ्यांची सेवा केली. दीन-दुबळ्यांचा ते आवाज बनले आणि पोचले घराघरात आणि मनामनात. त्याच साहेबांचा जनसेवेचा ध्यास मनात व कार्यात जोपासत आहे. अप्पा सदैव तुमच्या स्मरणात. तुमचाच धनंजय अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच आज त्यांनी गोपीनाथ मुंंडे यांच्या जयंतिनिमित्त आज नागपूर येथील शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस अभिवानद करून आदरांजली अर्पण केली. याचसोबत अप्पा आज आपल्यात नसले तरी जनसेवेचा त्यांनी दिलेला वसा व त्यांचा विचार कायम आपल्यात आहे. व राहिल. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना आवाहन केलं आहे. दरवर्षी आपण गोपीनाथ गडावर येता. तिथं आपण साहेबांची जयंती साजरी करतो. पण गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा आपल्या गावागावात मुंडे साहेबांची जयंती साजरी करा. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
स्व.मुंडे साहेब… हे नाव घेतलं की समोर येतो साहेबांचा चेहरा, तो चेहरा ज्याने आयुष्यभर शेतकरी-कष्टकऱ्यांची सेवा केली. दीन-दुबळ्यांचा ते आवाज बनले आणि पोचले घराघरात आणि मनामनात!
त्याच साहेबांचा जनसेवेचा ध्यास मनात व कार्यात जोपासत आहे… अप्पा सदैव तुमच्या स्मरणात…तुमचाच… pic.twitter.com/GSwxZkauB4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”