मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आज एसआयटी स्थापना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एसआयटीसंदर्भात फोनवरून चर्चा झाली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी स्वरूपात आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर जस्टीस लोयो यांच्या आत्महत्येचीही एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र या प्रकरणात कोणताही राजकीय अंंगल नाही. दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला. असा तपास निष्कर्षअंती काढण्यात आला होता. मात्र सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी दिशा त्यादिवशी नशेत होती. आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला. असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला सीबीआयने क्लिनचीट दिली होती.
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
दिशा सालियान प्रकरणी भाजपचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करीत आहेत. राज्य सरकारनं दिशा सालियान प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी आदित्य ठआकरेंचीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासुन सुरू आहेत. त्यावर मागच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते ? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता.
EAD ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, कुठे आहे सभा ?
हेही वाचा…सरकारमधील ‘दोन’ मंत्री कोण ? ज्यांच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?