नागपुर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच काल नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख तसेच माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस शिवाजीराव माने यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
नागपुर येथील रामगिरी या निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये माजी उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, महाराष्ट्र कामगार सेनेचे राज्य चिटणीस व्यंकटराव खंडेराव बिराजदार, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, लातूर ग्रामीणचे तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, शिवाजी पांढरे, युवराज वंजारे, महिला आघाडी संघटीका सविताताई पांढरे, अरुणाताई माने यांच्यासह औसा, निलंगा, देवणी, शिरूर, आनंदपाळ आणि एसटी कामगार सेनेचे असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव संजय मोरे उपस्थित होते.
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
दरम्यान, राज्यातील सरकार हे सर्व घटकांना न्याय देणारे सरकार असून वंदनीय हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे आणि त्यांना अभिप्रेत असलेले काम करणारे सरकार आहे. ज्या भागात आपण काम करता तिथे पक्ष बळकट करण्यासाठी काम करावे. आपण माझ्यावर जो विश्वास दाखवलात तो नक्कीच सार्थ ठरेल आणि तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असं यावेळी एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख तसेच माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस शिवाजीराव माने यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपुर येथील ‘रामगिरी’ या निवासस्थानी उपस्थित राहून #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना… pic.twitter.com/1hQkSfpXVj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 12, 2023
EAD ALSO :
हेही वाचा…दिशा सालियन प्रकरणी SIT स्थापन होणार ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या?
हेही वाचा…मोठी बातमी..! जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, कुठे आहे सभा ?
हेही वाचा…सरकारमधील ‘दोन’ मंत्री कोण ? ज्यांच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद