नागपूर : आज राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर शरद पवारांचा हा पहिला आणि 83 वा वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर छोटी पोस्ट करत शुभेच्छा दिल्यात. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही शरद पवारांना शुभेच्छा न दिल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ८३ वर्षाचे झाले आहेत. राज्यात मागील काही दिवसापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालयं. त्यामुळे यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यातच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी असं म्हटलंय की, देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री, पद्मविभूषण, आदरणीय शरद पवार साहेबांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन! साहेबांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी मनापासून शुभेच्छा! देशाचे तसेच अजित पवार गटातील इतरही नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. परंतु अजित पवारांच्या शुभेच्छा अद्यापही न आल्याने याची चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्या असं म्हणाल्या की, आधी लढाई जनहिताची !!! प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती. मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
देशाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री, पद्मविभूषण, आदरणीय @PawarSpeaks साहेबांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन! साहेबांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी मनापासून शुभेच्छा! pic.twitter.com/sw48zKkQvZ
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 12, 2023
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण… pic.twitter.com/IJvh46iMyv
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…लातुरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी जिल्ह्याप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…दिशा सालियन प्रकरणी SIT स्थापन होणार ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या?
हेही वाचा…मोठी बातमी..! जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, कुठे आहे सभा ?
हेही वाचा…सरकारमधील ‘दोन’ मंत्री कोण ? ज्यांच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट