नागपुर : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निकाल लागणार आहे. त्याआधी ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करीत आहे. या सुनावणीच्या दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तर शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी दिलेल्या साक्षवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यावर जोरदार टिका केलीय. तर या संपुर्ण प्रकरणावर आता उद्धव ठाकरे यांनी एक शक्यता वर्तवली आहे.
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी “३१ डिसेंबरला दिल्लीवरून जो आदेश येईल, त्यानुसार ते निकाल देतील”, अशा शब्दांत टीकास्र सोडलं. त्यावरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराला शिवसेनेचे समर्थन होते. त्यासाठी आम्ही निधी दिला. प्रभू श्रीराम कुण्या एकाची मक्तेदारी नाही. त्यांचे नशिब आहे की ते सध्या सत्तेत असल्याने उद्घाटन करताहेत. बाबरी पाडण्यात त्यांचा सहभागही नव्हता. मंदिरासाठी विशेष कायदा बनवा. असे मी सांगत होतो. नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला आणि योगायोगाने मी मुख्यमंत्री झालो. मला कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही. मला जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा जाणार असेही ठाकरेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने का लपवून ठेवला,?” सुप्रिया सुळेंचा सवाल
हेही वाचा…“अजितदादांच्या पिंपरीत भाजप ‘कमळ’ फुलवण्याच्या तयारीत”, आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढल्या ?
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?