नागपूर : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरिटिव्ह पिटीशनवर सुनावणी प्रलंबित असतानाचा राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांच सत्र सुरूच आहे. अलिकडेच राज्य मागासवर्गीय आयोगातील सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने एकच चर्चा सुरू आहे. यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टिका केली आहे.
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
राज्य मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगूडे यांनी ४ डिसेंबर रोजी राजीनामा दिला. राज्य शासनाकडून ९ डिसेंबरला मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव यांना राजीनामा स्वीकृत झालेला असल्याचे कळवण्यात आले. यापुर्वी आयोगाच्या सदस्यांनी राजीमाने दिले आहेत. शासनाने हि माहिती विधिमंडळात योग्य वेळी देणे आवश्यक होते परंतु त्यांनी ती दडवून ठेवली, हे धक्कादायक आहे. कोर्टात मराठा समाजाचे मागासलेपण हाच आयोग सिद्ध करणार आहे. परंतु आता आयोगच अस्तित्वात नाही, त्यामुळे शासन हे कसे करणार याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी समोर येऊन माहिती देणे आवश्यक आहे. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची बाब लपवून का ठेवली याबाबत देखील शासनाने तातडीने खुलासा करण्याची गरज आहे.हे सरकार मराठा आरक्षणाबाबत पुरेसे गंभीर नाही हेच यावरून सिद्ध होते. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
दरम्यान, राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती श्री.आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही? सरकारचं नेमकं अस चाललं काय ? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहे याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे. अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी राजीनामा दिला. राज्य शासनाकडून ९ डिसेंबर ला मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव यांना राजीनामा स्वीकृत झालेला असल्याचे कळवण्यात आले. यापुर्वी आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. शासनाने हि माहिती…
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजितदादांच्या पिंपरीत भाजप ‘कमळ’ फुलवण्याच्या तयारीत”, आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढल्या ?
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब