नवी दिल्ली : छत्तीसगड, त्यानंतर मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भाजपने धक्कातंत्र वापरलं आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्री पदी भाजपने निवड केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. वसुंधरा राजे आणि बाबा बालकनाथ यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा होती. मात्र वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंहे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे. भजनलाल शर्मा हे भरतपुरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केली.
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
भजनलाल शर्मा यांनी काॅंग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८,०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना बाजूला सारून भाजपने याआधी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदी मोहन यादव यांच्या नावाला पसंती दिली. तर दुसऱ्याबाजूला छत्तीसगडमध्ये केंद्रात मंत्री राहिलेले आदिवासी समाजाचे आमदार विष्णुदेव साय यांची मुख्यमंत्री पदी निवड करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?”, त्यामुळेच शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांना डिवचलं
हेही वाचा…“जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा अयोध्येला जाणार”, उद्धव ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने का लपवून ठेवला,?” सुप्रिया सुळेंचा सवाल
हेही वाचा…“अजितदादांच्या पिंपरीत भाजप ‘कमळ’ फुलवण्याच्या तयारीत”, आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढल्या ?
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट