नागपुर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात शेवट होत आहे. यावेळी नागपुरात युवा संघर्ष यात्रेची जोरदार सभा देखील पार पडली. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा विधिमंडळाच्या दिशेने कुच केली. मात्र अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा अडवण्यात आली. कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा अयोध्येला जाणार”, उद्धव ठाकरेंचं विधान
राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. एमपीएससी परिक्षेसंदर्भात प्रश्न आहेत. शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत. पण या मुद्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्विकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवारांनी म्हटलंय. एखाद्या आमदाराचे जर कुणी एकत नसेल तर सामान्य माणसाचे कुणी ऐकणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
हेही वाचा…“मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने का लपवून ठेवला,?” सुप्रिया सुळेंचा सवाल
दरम्यान, निवेदन देण्यासाठी रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा विधानभवनात जात असतांनी अडवली. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा बघायला मिळाला. या सर्व राडेबाजीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं आहे. रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन, कोण कोणचा समावेश ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ?
हेही वाचा..राजस्थानमध्ये भाजपचे आणखी एक धक्कातंत्र, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री
हेही वाचा…“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?”, त्यामुळेच शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांना डिवचलं