मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आज एसआयटी स्थापना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एसआयटीसंदर्भात फोनवरून चर्चा झाली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी स्वरूपात आदेश देण्यात आले आहेत. यातच आता याप्रकरणाची तपासणी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
दिशा सालियन प्रकरणात चौकशी करण्यासाठी सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वात आता दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. तर पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल या प्रकरणाचा तपास करतील. यासह मालवणी पोलीस ठाण्याचे सीनिअर पीआय चिमाजी आढाव तपास करणार आहे. त्यामुळे एसआयटीचं काम आता लवकरच सुरू होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा…“देशाच्या सुरक्षेशी तडजोड नको..!” महेश लांडगेंचा सभागृहात रूद्रावतार, अबू आझमींची बोलतीच केली बंद
दरम्यान, दिशा सालियन मृत्यूप्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांचं नाव सातत्याने घेतलं जात होतं. त्यामुळे या प्रकरणी कोणती अधिक माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मात्र या प्रकरणात कोणताही राजकीय अंंगल नाही. दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला. असा तपास निष्कर्षअंती काढण्यात आला होता. मात्र सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी दिशा त्यादिवशी नशेत होती. आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला. असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला सीबीआयने क्लिनचीट दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा..राजस्थानमध्ये भाजपचे आणखी एक धक्कातंत्र, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री
हेही वाचा…“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?”, त्यामुळेच शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांना डिवचलं
हेही वाचा…“जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा अयोध्येला जाणार”, उद्धव ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने का लपवून ठेवला,?” सुप्रिया सुळेंचा सवाल
हेही वाचा…“अजितदादांच्या पिंपरीत भाजप ‘कमळ’ फुलवण्याच्या तयारीत”, आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढल्या ?