नागपुर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात शेवट होत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्दविज सिंह, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी रोहित पवारांसह, रोहित पाटील, संजय राऊतांची भाषणं झालीत. या भाषणात संजय राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…“अजितदादांच्या पिंपरीत भाजप ‘कमळ’ फुलवण्याच्या तयारीत”, आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणी वाढल्या ?
संजय राऊत म्हणाले की, आपल्या राज्यात एक फुल दोन हाफ नाहीयेत. एक फुल आणि दोन डाऊटफुल आहेत. यांच्यात फुल कुणीच नाही. यांच्यात कुणी फुल असेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. अनिल देशमुख बसले आहेत. हे आमचे जेलमधले मित्र आहेत. जेलमधली मैत्री पक्की असते. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि पवारांचा चेला आहे. याला म्हणतात डबल इंजिन असंही राऊतांनी म्हटलं.
हेही वाचा..“अप्पा आज आपल्यात नसले तरी..,”गोपीनाथ मुंडे यांच्या जंयतीनिमित्त धनंजय मुंडेंची भावनिक पोस्ट
दरम्यान, पुण्यातून सुरू झालेली युवा संघर्ष यात्रा आज नागपुरात पोहोचली आहे. तब्बल ८०० किमी पेक्षा अधिक अंतर पायी चालून रोहित पवार नागपुरात पोहोचले आहेत. यामध्ये १० जिल्हे, २० तालुके आणि ४०० पेक्षा अधिक गावांना रोहित पवारांनी भेटी दिल्या आहेत. यातच जवळपास २ लाख जनतेशी थेट संवाद साधला असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन, कोण कोणचा समावेश ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ?
हेही वाचा..राजस्थानमध्ये भाजपचे आणखी एक धक्कातंत्र, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री
हेही वाचा…“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?”, त्यामुळेच शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांना डिवचलं
हेही वाचा…“जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा अयोध्येला जाणार”, उद्धव ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा सरकारने का लपवून ठेवला,?” सुप्रिया सुळेंचा सवाल