नागपूर : सध्या राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. तर विरोधी पक्षांकडून जोरदार प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. त्यावर सत्ताधारी पक्षांकडूनही त्यावर उत्तरे दिली जात आहेत. परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक जण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतांना दिसत आहेत.
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उद्योजक तुकाराम दुधे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष उमेश लक्ष्मणअप्पा भुसारी, श्रीराम संघटनेचे पप्पू श्रीराम मोरवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे शिंदेंनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार सदा सरवणकर, कॅप्टन अभिजित अडसूळ आणि अकोल्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन, कोण कोणचा समावेश ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ?
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यात महायुती सरकार आल्यापासून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. यंदा अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं असलं तरीही हे सरकार शेतकऱ्यांना नक्की दिलासा देईल असेही यासमयी स्पष्ट केले. शिवछत्रपतींचे विचार आदर्श मानून सरकारचे काम सुरू आहे. नुकताच जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. त्यांनी जिथे आपले आरमार स्थापन केले त्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर यंदा भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आला. शिवछत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा वध केला ती वाघनखे परत आणण्याचे काम आपल्या सरकारने केलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य साकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उद्योजक तुकाराम दुधे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष उमेश लक्ष्मणअप्पा भुसारी, श्रीराम संघटनेचे पप्पू श्रीराम मोरवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह #शिवसेना… pic.twitter.com/osw69PzWnh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती