पुणे : जशी जशी लोकसभा निवडणुक जवळ येत आहे. तसा राजकीय नेत्यांच्या हालचालींमध्ये वाढ होतांना दिसत आहे. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी राजकीय लढत होईल, अशी शक्यता वर्तवली येत असली तर प्रत्यक्ष निवडणुकीत याचा काय चित्र? असणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच की काय प्रत्येकजण आता आपापली तयारी स्वत:च्या तयारीने करतांना दिसत आहेत. यातच पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अमोल कोल्हे खासदार असून ते शरद पवार गटात आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळेच की काय आता या मतदारसंघात अजित पवारांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील यांचे दौरे आता याठिकाणी सुरू झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून पुर्वा वळसे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार ? तसेच नेमकं काय चालु आहे. याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला
शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अमोल कोल्हे विरूद्ध शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात खरी लढत होत असते. परंतु महायुती स्थापन झाल्यानंतर या मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा सांगितल्याने आढळराव पाटलांची अडचणी झाली आहे. यातच आंबेगाव तालुक्याचे राजकारण हे दिलीप वळसे पाटलांच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे या निवडणुकीची पुढची दिशा देखील तेच ठरवणार असून त्या उद्देशातून पुर्वा वळसे पाटील यांना सक्रिय होण्याचे संकेत दिले जात असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहे का ?” भाजपच्या ‘या’ आमदाराने सगळ्यांची केली बोलती बंद
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न
हेही वाचा…ना मुळीक, ना मोहोळ, पुणे लोकसभा पोटनिवडणुककरीता भाजपने उमेदवार शोधला ; मोदींशी आहे थेट संबंध
हेही वाचा...पुणे लोकसभेची पोटनिवडणुक घ्या,” मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार