नागपुर : हिवाळी अधिवेशनात १२ डिसेंबरपासून मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. काल बुधवारी सर्व पक्षीय आमदारांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. यातच आमदारांनी आपल्या जातीचा उल्लेख सभागृहात केला तर जातीचे लोक खूश होऊन मते देतील म्हणत भाजपचे आमदार संजय कुटे यांनी सभागृहातील आमदारांना खडेबोल सुनावले. तसेच मी कधीही जातीवर बोलत नाही, पण आजकाल प्रत्येक आमदार वा नेता हा त्याच्या मतदार संघातल्या जातीच्या गणितावर राजकीय समीकरण ठरवत असतो असंही ते म्हणाले.
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला
आज सर्वत्र आपल्या राजकीय सोईचे काय राहिल? कोणाची बाजू घेतली तर आपला मतदारसंघ सुरक्षित होईल. याच अविर्भावातून मराठा आरक्षण संदर्भात सभागृहात बोलल्या जात आहे. स्वत: चे राजकारण ,सांभाळत पुढे जाणे हे सध्या अत्यंत धोक्याचे झाले आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ते स्वत; पणे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, ही आपली भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेच पण ओबीसी मधून नको हेच सर्व नेत्यांनी भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहेत का ? कारण सर्वांना माहिती आहे की असं करता येऊ शकत नाही मग याविषयी का कुणी बोलत नाही ? का कुण्या दोन चार लोकांनाच टार्गेट केलं जातं? याचाही विचार झाला पाहिजे. कुणाला किती टार्गेट केलं जातंय. हे सर्व महाराष्ट पाहत आहे. असा इशाराही त्यांनी दिला.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न
हेही वाचा…ना मुळीक, ना मोहोळ, पुणे लोकसभा पोटनिवडणुककरीता भाजपने उमेदवार शोधला ; मोदींशी आहे थेट संबंध
हेही वाचा...पुणे लोकसभेची पोटनिवडणुक घ्या,” मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश