नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फॉऊंडेशन आणि ई-मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येत आहे. येत्या १७ फेब्रूवारी रोजी सुप्रिया सुळे यांना दिल्ली येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा
सतराव्या लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक, अनुकरणीय सर्वोत्त कामगिरी आणि लोकसभेतील उपस्थिती यांच्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कमाल यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. असे फॉउंडेशनचे के. श्रीनिवास यांनी कळविले आहे.
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित
दरम्यान, १६ व्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले होते. तर २२ खासगी विधेयके मांडली आहे. ज्युरी कमिटीचे चेअरमन आणि केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल आणि सहचेअरमन तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी. एस कृष्ण मूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ना मुळीक, ना मोहोळ, पुणे लोकसभा पोटनिवडणुककरीता भाजपने उमेदवार शोधला ; मोदींशी आहे थेट संबंध
हेही वाचा...पुणे लोकसभेची पोटनिवडणुक घ्या,” मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला