नवी दिल्ली : बुधवारी नवीन संसद भवनामध्ये दोन तरूणांनी घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू झालं. या घटनेचे पडसाद त्यानंतर गुरूवारी लोकसभेत उमटले. यावेळी विरोधी पक्षांचे सदस्य चांगलेच आक्रमक होत त्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतून काॅंग्रेसच्या पाच खासदारांचे निलंबन केले.
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार
लोकसभेत राडा घातल्याप्रकरणी टीएन प्रतापन, हिबी ईडन, एस. जोथिमनी,रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे या काॅंग्रेसच्या पाच खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावेळी या पाच जणांनी सभागृहात चुकीची वर्तणूक केल्याबद्दल हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबन करण्यात आले आहे. तर राज्यसभेतून तृणमूल काॅंग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली.
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, संसद हल्ला प्रकरणातील आरोपी १ ते दीड वर्षापासून फेसबुकवर एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी भगतसिंह नावाचा ग्रुप तयार केला होता. त्यांचे विचार एकमेकांशी जुळले होते. मनोरंजन, सागर शर्मा, नीलम आझाद आणि अमोल शिंदे हे तीन दिवसांपुर्वी दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर संसदेवर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर संसदेतील प्रेक्षक पासवर निर्बंध आणले. या प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वळसे पाटलांच्या कन्याचा दौरा अन् शिरूरमधील राजकीय वारं फिरलं ; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहे का ?” भाजपच्या ‘या’ आमदाराने सगळ्यांची केली बोलती बंद
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न
हेही वाचा…ना मुळीक, ना मोहोळ, पुणे लोकसभा पोटनिवडणुककरीता भाजपने उमेदवार शोधला ; मोदींशी आहे थेट संबंध
हेही वाचा...पुणे लोकसभेची पोटनिवडणुक घ्या,” मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश