नागपूर : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. यातच आता अजितदादांनी पत्र चोरलं अशी टिका रोहित पवारांनी केली होती. त्यावर आता आमदार सुनील शेळके यांनी उत्तर देतांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवारांनी याआधी तीन वेळा पत्रावर सह्या केल्याचा आरोप सुनील शेळके यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
हेही वाचा...पुणे लोकसभेची पोटनिवडणुक घ्या,” मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश
२० जून २०२२ ला महाविकास आघाडी सरकार कोसळत असतांना अजित पवार जे म्हणतील त्याला आपला पाठिंबा देणारा पत्र तयार केलं होतं. त्यावर ४७ आमदारांच्या सह्यांच्या आधीच रोहित पवारांनी सही केली होती. त्यानंतर २ जुलै २०२२ ला नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने अजित पवारांना विरोधी पक्षनेते करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरही रोहित पवारांची सही होती. त्यावेळी सत्तेत जायचं ठरलं होतं. त्यात ३२ आमदारांना सह्या केल्या होत्या. असंही सुनील शेळके यांनी सांगितलं.
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार
दरम्यान, २ जुलै २०२३ रोजी महायुतीत गेलो त्यावेळीही रोहित पवारांना विचारलं देखील नाही. आम्ही निर्णय घेतला आणि अजित पवारांना सांगितलं आणि आम्ही सत्तेत सहभागी झालो. यातच अजित पवारांनी दुसरी पिढी निर्माण केली नाही असं ते म्हणतात. मग सुनील शेळके, नीलेश लंके, राज नवघरे, या सर्व सामान्य लोकांना संधी कुणी संधी दिली? जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ला सोडून दुसऱ्याला कुणाला निवडून आणलं हे जाहीर करावं असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा...काॅंग्रेसच्या पाच खासदारांना दणका ; सभागृहात राडा घातल्याप्रकरणी लोकसभेतून निलंबित
हेही वाचा…वळसे पाटलांच्या कन्याचा दौरा अन् शिरूरमधील राजकीय वारं फिरलं ; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या असं म्हणणारा एकतरी आमदार सभागृहात आहे का ?” भाजपच्या ‘या’ आमदाराने सगळ्यांची केली बोलती बंद
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा विशेष संसदरत्न महारत्न
हेही वाचा…ना मुळीक, ना मोहोळ, पुणे लोकसभा पोटनिवडणुककरीता भाजपने उमेदवार शोधला ; मोदींशी आहे थेट संबंध