नागपूर : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी पोलिसांनीच मदत केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थितीत केला. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पोलिसांनीच मला पळवून लावलं, या ललित पाटीलच्या आरोपवरही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
हेही वाचा…“सत्ता स्थापनाच्या वेळी रोहित पवारांच्या तीन सह्या,” सुनील शेळकेंनी थेट तारखा सांगतिल्या
ललित पाटील एक गुन्हेगार आहे. त्याची विश्वासार्हता काय? तसेच त्याला ज्यांनी मदत केली आहे. अशा चार पोलिसांना कलम १३१ अंतर्गत बडतर्फ करण्यात आलं आहे. अमली पदार्थांशी संबंधित थेट सहभाग असलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आलीय. अशा १० पोलिसांना बडतर्फ करण्यात आलंय. पोलीस आता केवळ अमली पदार्त करणारे आणि विकणाऱ्यांवरच कारवाई करत नाहीत. तर विक्रेत्यांची साखळी शोधून संपूर्ण रॅकेटवर कारवाई करत आहेत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा...काॅंग्रेसच्या पाच खासदारांना दणका ; सभागृहात राडा घातल्याप्रकरणी लोकसभेतून निलंबित
दरम्यान, समाजमाध्यमांद्वारे जसे की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. तसेच गुगल पेसारख्या युपीआय पेमेंट अॅपद्वारे पैसे देणं आणि कुरीअर एजन्सींच्या माध्यमातून अमली पदार्थींची डिलीव्हरी करणं असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही कुरीअर एजन्सींना एक नियमावली पाठवली आहे. तसेच त्यांच्याकडे असं कुठलंही पॅकेज सापडलं तर सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल , असंही सांगण्यात आलंय. असंही फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं
हेही वाचा...जालना घटनेतील ऋषीकेश बेद्रेला अखेर जामीन मंजूर ; कोर्टाने ठेवल्या ‘या’ अटी
हेही वाचा…शिंदेंचा ठाणे लोकसभेवर डोळा ; लोकसभा जिंकण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा
हेही वाचा…विधानसभेच्या परिसरातच काॅंग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; कुणी धरली भाजपची वाट ?
हेही वाचा…जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द, कर्मचारी संप मागे घेणार का ?