नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. यातच आपल्या विविध मागण्यांसाठी जवळपास १०० मोर्चे विधिमंडळावर धडकले आहेत. आपल्या मागण्यांसाठी विविध संघटना नागपुरात जोरदार आंदोलन करतांना दिसत आहेत. त्यामुळे सध्या नागपूरातील वातावरण चांगलचं गाजत आहे. याच दरम्यान एका शेतकरी पुत्राने सरकारकडे अजब मागणी केली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
नागपुराच्या रस्त्यावर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान अनेक मोर्चे रस्त्यावर उतरले आहेत. यातच एका शेतकऱ्याकडे एक पोस्टर दिसत आहे. यामध्ये माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. असं म्हटलं आहे. त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर एका शेतकऱ्याकडे असलेल्या पोस्टरवर मला शेतीसाठी पाणी मिळत नाही. मोटरीसाठी पुर्णवेळ लाईट मिळत नाही. अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळत नाही. तरीही मी ताठ मानेनं शेती करतो. पण माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही. पैशाअभावी जगता येत नाही लग्नाशिवाय मरता येत नाही. काय करू ? मी एक लग्नाळू शेतकरी असंही त्यात म्हटलं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं
दरम्यान, नागपुरच्या रस्त्यावरून हा मोर्चा जात असताना त्यांच्या हातातील पोस्टरकडे नागपुरकर कुतूहलाने बघत होते. हे सर्व तरूण सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्यांची पार्श्वभूमीही शेतकरी आंदोलनाची आहे. ते स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांचे प्रश्न आगळ्यावेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी विधिमंडळावर आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव