ठाणे : शिवसेना अपात्र आमदारांवरील निकाल ३१ डिसेंबरपर्यंत लागणार होता, परंतु त्याची तारिख आता बदलण्यात आली असून १० जानेवारीला अपेक्षित आहे. त्याआधीच आता ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुक लढविण्याचे आवाहन दिले आहे.
हेही वाचा...जालना घटनेतील ऋषीकेश बेद्रेला अखेर जामीन मंजूर ; कोर्टाने ठेवल्या ‘या’ अटी
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदाराकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून निवडणूक लढवावी. अन्यथा मी त्यांच्याविरूद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे. असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया देण्यात येईल ? ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…शिंदेंचा ठाणे लोकसभेवर डोळा ; लोकसभा जिंकण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ठाणे लोकसभा मतदारसंघाची चांगलीच रणनिती आखली आहे. विद्यमान खासदार राजन विचारे सध्या ठाकरे गटात असल्याने याठिकाणी उमेदवार देण्याच्या शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. कालच यासंदर्भात ठाण्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाण्यासह कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं