नागपूर : भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात आज १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताचा विषय काढला. सलीम कुत्ता हा जामीनावर बाहेर आला असता त्याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्ट्या करत होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर याप्रकरणासाठी एसआयटी स्थापन करून सुधाकर बडगुजर यांची चौकशी केली जाईल. अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा…शिंदेंचा ठाणे लोकसभेवर डोळा ; लोकसभा जिंकण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा
सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असून तो १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. त्यावेळी कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुप्रिम कोर्टाने २०१३ साली ही शिक्षा वैध ठरवली. मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बॉम्बस्फोटातील महत्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याच्याशी मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्ताशी जवळीक आहे. मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेऊन शस्त्रसाठा पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुजरातमधून हा शस्त्रपुरवठा जमा करून तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता, हाच साठा स्फोटांसाठी वापरला गेलाय . सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले आरडीएक्स पुरवल्याचाही आरोप आहे.
हेही वाचा…विधानसभेच्या परिसरातच काॅंग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश ; कुणी धरली भाजपची वाट ?
दरम्यान, नितेश राणे यांनी केलेले आरोप सुधाकर बडगुजर यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, २०१६ मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा होती. त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी मला अटक झाली आणि मी १५ दिवस तुरूंगात होतो. मी आलो तेव्हा माझ्यावर एक केसही नव्हती. सलीम कुत्ताला आधीच अटक झाली असेल. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे आरोप बेबनाव आहेत. मार्फिंग केलेले आहेत आणि मला मान्य नाहीत, असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं
हेही वाचा...जालना घटनेतील ऋषीकेश बेद्रेला अखेर जामीन मंजूर ; कोर्टाने ठेवल्या ‘या’ अटी