ठाणे : प्रेयसीसोबत झालेल्या वादातून अश्वजीत गायकवाड या तरूणाने अंगावर कार घालून चिरडत तिला गंभीर जखमी केल्याची घटना घोडबंदर रोडवरील ओवळा भागात घडली आहे. प्रिया सिंगे असे तिचे नाव आहे. विशेष म्हणजे हा पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून सभागृहात महेश लांडगेंचा पारा चढला ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना आरक्षणावरून चांगलचं सुनावलं
प्रिया सिंग ही उच्चशिक्षित तरूणी घोडबंदर येथील रहिवासी असून अश्विजित गायकवाड याने तिला सोमवारी पहाटे साडे चार वाजता ओवळा येथील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटायला बोलावले. तेथेच त्यांच्यात वाद झाला अन् अश्विजितने प्रियाला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मित्रांच्या मदतीने अश्विजितने प्रियाच्या अंगावर कार चढवली. यानंतर त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिने यासंदर्भात इंस्ट्राग्रामवर घटना सांगितली आहे. तसेच आता तिच्यावर ठाण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा...जालना घटनेतील ऋषीकेश बेद्रेला अखेर जामीन मंजूर ; कोर्टाने ठेवल्या ‘या’ अटी
दरम्यान, अश्विजीत गायकवाड आणि त्याचा मिक्ष रोमिल पाटील आणि ड्रायव्हर सागर यांनी मारहाण करत तिच्या अंगावर फोर व्हिलर गाडी चढवली. या मारहाणीत ही युवती गंभीर जखमी झाली असून सध्या ती अत्यंत वाईट अशा मानसिक अवस्थेत आहे. राज्यातील कायद्याची परिस्थिती अशी आहे. एका महिलेला एका पक्षाचा पदाधिकारी सत्ता असल्याचा माज दाखवत राजरोसपणे तिच्यावर गाडी चढवतो. जिवे मारण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ही घटना घडली. माझा एकच प्रश्न आहे, सदरील युवती न्यायाची अपेक्षा करत आहे. या राज्याचं पोलीस खातं,गृह खात आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या मुलीला न्याय देतील का..? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
View this post on Instagram
READ ALSO :
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…