मुंबई : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीची रणनिती भाजप महाराष्ट्रात आखणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे. त्याच अनुषगांने राज्यातील काही विधानसभा आमदार, मंत्र्यांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाबाबत मोठी बातमी, नार्वेकरांची कोर्टात धाव
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही केंद्रीय मंत्री, तसेच खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. त्यात त्यांना मोठं यश आलं. आता हीच रणनिती महाराष्ट्रात अवलंबली जाण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभामधून, अभिनेत्री माधूरी दिक्षीत यांना उत्तर मुंबई, मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दक्षिण मुंबई, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुर लोकसभा, गिरीश महाजन यांना गिरीश महाजन साठी जळगाव, छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड, तसेच अतुल सावे यांचं नाव देखील चर्चेत आहे.
हेही वाचा…“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
दरम्यान, राज्यात सध्या महायुती असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा भाजपने संकल्प ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेची जय्यत्त तयारी भाजपने केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यातच आता विधानसभांच्या निवडणुकांवरून भाजपचं वजन आणखी वाढलं असून त्यांनी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ