मुंबई : अदानी समुह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावीचा पुनर्विकास करताना ३०० चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहे. त्याएवजी ४०० ते ५०० चौरस फुटांची घरे द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट मोर्चा काढत आहेत. शिवसेनेच्या या मोर्चावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. धारावी टी जंक्शनपासून दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने मोर्चा बीकेसीकडे जाणार असून सीएनजी पेट्रोल पंपापासून मोर्चा पुढे बीकेसीच्या फटाका मैदानात थांबणार आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. ठाकरे गटाच्या मोर्चात आणखी १५ पक्ष आणि संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?
दरम्यान, धारावीतील सर्व निवासी- अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा. निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या, टीडीआरसाठी सरकारनं स्वत: ची कंपनी नेमावी. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मोफत, नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा. प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या, शाहू नगर लेबर कॅम्पमधील रहिवाश्यांना ७५० चौरस फुटांची घरे द्या, अशा मागण्या ठाकरे गटाकडून ठेवण्यात आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा
हेही वाचा..नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना