पुणे : दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कोट्यवधींचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा आरोप काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मागील काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे.
हेही वाचा..“बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी”, भाजपचा आरोप, कोण आहे सलीम कुत्ता ?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. मुंबई -बेंगळुरू महामार्गालगत वाकड परिसरातील मोक्याची दोन हेक्टर जागा केवळ २०० रूपये कोटींना महापालिकेने विकासकाला दिली आहे. आजच्या बाजारमुल्यानुसार यामध्ये तब्बल दीड हजार कोटींहून अधिक रकमेचा टीडीआर घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…“सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजपचेही नेते ; गिरीश महाजनांचाही समावेश,” ठाकरे गटाने दाखवला व्हिडीओ
दरम्यान, धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात आज ठाकरे गटाचा भव्य मोर्चा मुंबईत निघणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि ठाकरे गटाचे इतर नेते या आंदोलन सहभागी होणार आहेत. तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं भाषण देखील होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान