मुंबई : अदानी समुह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावीचा पुनर्विकास करताना ३०० चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहे. त्याएवजी ४०० ते ५०० चौरस फुटांची घरे द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट मोर्चा काढत आहेत. शिवसेनेच्या या मोर्चावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी ..! भाजप नेत्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडले ; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातली घटना
असे कितीही मोर्चे निघाले तरी धारावीकरांना आम्ही पक्के घर देणारच आहे. उद्धव ठाकरे गटाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात बाधा आणून धारावीकरांना घरेच मिळू द्यायची नाहीत. मी मुख्यमंत्री असताना प्रकल्पाचे टेंडर निघाले आणि ते मंजुरीला आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने ते रद्द केले. उद्धव ठाकरे अशी दुपट्टी भूमिका नेहमीच घेतात. टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे. मात्र असे कितीही मोर्चे निघाले तरी धारावीकरांना आम्ही पक्के घर देणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
हेही वाचा…” मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्याविरोधात निवडणुक लढवावी, अन्यथा मी..,” आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलं आव्हान
दरम्यान, धारावीतील सर्व निवासी- अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा. निवासी झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर मोफत द्या, टीडीआरसाठी सरकारनं स्वत: ची कंपनी नेमावी. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतींमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मोफत, नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी, अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा. प्रकल्पाचं स्वरूप समजण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या, शाहू नगर लेबर कॅम्पमधील रहिवाश्यांना ७५० चौरस फुटांची घरे द्या, अशा मागण्या ठाकरे गटाकडून ठेवण्यात आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा
हेही वाचा..नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली
हेही वाचा…“..म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही”,काय करू ? विधिमंडळाच्या परिसरात तरूण शेतकऱ्याची मागणी