पिंपरी । विशेष प्रतिनिधी भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बालेकिल्ला असलेल्या मोशी प्रभाग क्रमांक २ (जाधववाडी-बाेऱ्हाडेवाडी) मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हॉर्स रायडिंगचा घाट घातला. त्याला स्थानिक नागरिक, सोसायटीधारकांनी विरोध केला. या विरोधाचे प्रतिनिधीत्व करीत शिवसेना उपशहर संघटिका रुपाली आल्हाट यांनी उपोषणास्त्र काढले. या उपोषणाला शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठिंबा दिला. अखेर प्रशासनाला या प्रकल्पासाठी स्थगिती द्यावी लागली. त्यामुळे ‘‘हॉर्स रायडिंग मैदानाची ‘रेस’मध्ये… ते आले…त्यांनी पाहिलं… ते जिंकून गेले सारे!’’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा...नितेश राणेंना मोठा झटका, कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला, ३० जानेवारील हजर राहण्याचे कोर्टाचे सक्तीचे आदेश
महापालिका प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या दृष्टीने दाट लोकवस्तीत हॉर्स रायडिंगचा अनावश्यक प्रस्ताव तयार केला. प्रभागातील सामान्य नागरिकांना हा खेळ न परवडणारा होता. या विरोधात स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधीही मैदानात उतरले. शिवसेनेच्या रुपाली आल्हाट यांनी उपोषण सुरू केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित गव्हाणे आणि महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वादात ‘एन्ट्री’ मारली. हॉर्सरायडिंगला विरोध असून, महापालिका प्रशासन जबरदस्ती हा प्रकल्प लादत असेल, तर आम्हाला संसदेत मुद्दा मांडावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. त्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नमते घेतले.
हेही वाचा…राज्यात गुंडाराज..! रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, आरोपी मोकाट, विरोधकांचा सरकारवर संताप
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक लोकप्रतिनिधी दोनदा भेटले होते. दुसरीकडे, शिवसेनेचे आमदार सचिन आहेर यांनी हा विषय राज्याच्या विधीमंडळ नागपूर अधिवेशनामध्ये मांडला. लक्षवेधी लावली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षण बदलण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांनी हॉर्सरायडिंग प्रस्तावाला स्थगिती दिल्यानंतर ‘पॉलिटिकल मायलेज’ साठी स्थानिक लोकप्रतिनिधीं आनंदोत्सव साजरा केला. त्याला उपस्थित राहत खासदार कोल्हे यांनी महायुतीला आव्हानही दिले.
कविता आल्हाट विरुद्ध रुपाली आल्हाट रस्सीखेच…
हॉर्सरायडिंगचा मुद्दा समोर आला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. शिवसेनेच्या रुपाली आल्हाट यांनी उपोषण करुन विरोधाची धार तीव्र केली. कारण, याच प्रभागातून २०१७ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आहे. स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या मुद्यावर रुपाली आल्हाट यांनी ‘अचूक टायमिंग’ साधले. याउलट, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी याच मुद्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोनदा भेट घेतली. कारण, कविता आल्हाट याच प्रभागातून तीव्र दावेदार आहेत. परिणामी, आल्हाट विरुद्ध आल्हाट असा संघर्ष पेटला असून, त्याला स्थानिक राजकीय समीकरणांची झालर आहे. या लढाईत उपोषणामुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या एन्ट्रीमुळे रुपाली आल्हाट यांचे पारडे जड ठरले आहे. कविता आल्हाट पहिल्यादा अजित पवारांना भेटल्या. त्यावेळीच प्रशासनाला आदेश दिले असते, तर रुपाली आल्हाट यांना ‘पॉलिटिकल मायलेज’ मिळाले नसते, असा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ आहे.
हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका
महेश लांडगे समर्थक तटस्थ…
सत्ताधारी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, तसेच नितीन बोऱ्हाडे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, सोनम जांभूळकर अशा लांडगे समर्थकांनी हॉर्स रायडिंग विषयावर कोणतीही ठाम भूमिका घेतलेली पहायला मिळाले नाही. विशेष म्हणजे, हॉर्सरायडिंग व्हावे किंवा नको… समर्थन आणि विरोधही केला नाही… असा नरो वा कुंजरो वा… ‘स्टँड’ घेतल्यामुळे भाजपाला याचे श्रेयही घेता आले नाही. तसेच, पूर्वाश्रमीचे लांडगे समर्थक माजी नगरसेवक वसंत बोराटे यांचाही आक्रमकपणा दिसला नाही. याउलट, खासदार अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच एखाद्या महत्त्वाच्या मुद्यावर भोसरी मतदार संघातील या विषयावर प्रत्यक्ष लक्ष घातले आणि राजकीय श्रेय खेचून घेतले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
READ ALSO :
हेही वाचा...राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष, असे आजपर्यंत कुणी हिणवलं ? फडणवीसांना शरद पवार गटाचा तिखट सवाल
हेही वाचा…“बिनडोक, दुरदृष्टी नसलेला व्यक्तीच्या दबावापोटी लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का?” रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
हेही वाचा…एैसा कैसा चलेगा टोमणेसम्राट??? धारावीच्या मोर्चावरून शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“जागांची चिंता करू नका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा ,” देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेही वाचा…“मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप