मुंबई : अदानी समुह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावीचा पुनर्विकास करताना ३०० चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहे. त्याएवजी ४०० ते ५०० चौरस फुटांची घरे द्यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ठाकरे गट मोर्चा काढत आहेत. त्यावरून आता दोन्ही बाजूंच्या वतीने टिका केली जात आहे.
हेही वाचा…धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?
धारावीच्या मोर्चाचा टिझर ठाकरे गटाकडून जारी करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटानेही टिझर वरून ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. यातच शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्यांनी टिझर ट्विट करत आता राजकारण नको. विकास हवाय. हीच धारावीकरांच्या मनकी बात. स्वत : चा दुसरा बंगला बांधायला पैसा येतो. पण धारावीकरांना हक्काचं घर मिळतंय, तर यांना पोटदुखी होतेय. एैसा कैसा चलेगा टोमणेसम्राट??? अस म्हणत शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंना डिवचलंय.
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा
दरम्यान, असे कितीही मोर्चे निघाले तरी धारावीकरांना आम्ही पक्के घर देणारच आहे. उद्धव ठाकरे गटाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात बाधा आणून धारावीकरांना घरेच मिळू द्यायची नाहीत. मी मुख्यमंत्री असताना प्रकल्पाचे टेंडर निघाले आणि ते मंजुरीला आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने ते रद्द केले. उद्धव ठाकरे अशी दुपट्टी भूमिका नेहमीच घेतात. टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जाणार आहे. मात्र असे कितीही मोर्चे निघाले तरी धारावीकरांना आम्ही पक्के घर देणारच असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
”आता राजकारण नको.. विकास हवाय..” हीच धारावीकरांच्या मनकी बात…
स्वतःचा दुसरा बंगला बांधायला पैसा येतो… पण धारावीकरांना हक्काचं घर मिळतंय तर यांना पोटदुखी होतेयं…
एैसा कैसा चलेगा टोमणेसम्राट??? pic.twitter.com/E1hFMt5aPF— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जागांची चिंता करू नका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा ,” देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना
हेही वाचा…“मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
हेही वाचा...नितेश राणेंना मोठा झटका, कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला, ३० जानेवारील हजर राहण्याचे कोर्टाचे सक्तीचे आदेश
हेही वाचा…राज्यात गुंडाराज..! रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, आरोपी मोकाट, विरोधकांचा सरकारवर संताप
हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका