नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुर येथे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संबोधित करतांना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर आरोप केले आहेत. त्यावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना सुप्रिया सुळे यांचं विधानं आपण पाहिली आहेत. मंडल आयोग लागू झाला. तेव्हा देता आलं असता. न्यायालयाचे निवडे आले. तेव्हा देता आले असता. परंतु त्यांना कधीच द्यायचं नसंत. त्यांना फक्त समाजाला झुंजवत ठेवायचं होतं. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. परंतु आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेच, परंतु कोर्टात ते टिकवून ठेवलं. त्यानंतर सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली.
हेही वाचा…लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली ? ‘या’ आमदारांना मिळणार खासदाराकीचं तिकीट, यादी आली
मंडल आयोगाला सर्वात जास्त विरोध छगन भुजबळांनी केला होता. मग आता मराठा आरक्षणाला विरोध का करत आहेत. ? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार परंतु, काहीही झालं तर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर संकट येऊ देणार नाही, हे आम्ही कमेंटमेंट दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. असं समजून सांगा. तसेच ओबीसी आणि मराठा समाजातील विभाजनचं लोण पसवू देऊ नका. निवडणुकांची आपण चिंता करत नाही. यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा...नितेश राणेंना मोठा झटका, कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला, ३० जानेवारील हजर राहण्याचे कोर्टाचे सक्तीचे आदेश
हेही वाचा…राज्यात गुंडाराज..! रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, आरोपी मोकाट, विरोधकांचा सरकारवर संताप
हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा